मालवण, दि प्रतिनिधी मालवण पत्रकार समितीच्यावतीने 12 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते एक यावेळेत तालुकावासियांसाठी येथील ग्रामीण रूग्णालयात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात हृदयविकार, मधुमेह, किडनीविकारासह हाडांच्या आजारावर मोफत तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून होणार आहे.
डॉ. गौरव घुर्ये हे हृदयरोग, श्वसनविकार, मधुमेह व किडनी विकारावर रुग्णांची तपासणी करणार आहे. डॉ. दत्तात्रय ठाकूर हे हाडांचे आजार, मणक्यांचे आजार, सांधेदुखी, संधीवात, हाडांचे इन्फेक्शन यासह अन्य हाडांच्या आजाराच्या रुग्णांची तपासणी करणार आहेत. या शिबिराचा तालुक्यातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन मालवण पत्रकार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
