पिंगुळी वायरमनची बदली झाल्यास आंदोलन

ग्रामस्थांचा इशारा;सहाय्यक अभियंता यांना दिले निवेदन

कुडाळ ता.०९-:* पिंगुळी व नेरुर येथील वायरमेन दिनेश करिलगेकर यांची बदली करु नये. तसेच गुरुवारपासून त्यांना कामावर हजर करुन घेण्यात यावे. अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल व याला सर्वस्वी जबाबदार सहाय्यक अभियंता राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

याबाबतचे निवेदन सहाय्यक अभियंता पाटील यांना देण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुङाळकर, माजी सरपच राजन पांचाळ, दादा चव्हाण, मनसे उपतालुका अध्यक्ष दिपक गावङे, नेरुर उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावङे, शाखाध्यक्ष वैभव धुरी, दताराम गावङे, नेरुर सदस्य प्रसाद गावङे , अजित मार्गी, समीर मयेकर, मगेश राऊत उपस्थित होते.

You cannot copy content of this page