वरची गुरामवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शैलेंद्र शंकरदास यांची बिनविरोध निवड

मालवण ता.०९-:मालवण तालुक्यातील वरची गुरामवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शैलेंद्र अनंत शंकरदास यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल शंकरदास यांचे सरपंच सौ. स्वाती वाईरकर यांच्यासह अन्य सदस्य आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश पेणकर, मकरंद सावंत, मयुरी कुबल, रुपाली परुळेकर, प्राची म्हाडगूत, ग्रामसेवक प्रकाश सरमळकर तसेच सुनील नाईक, आबा कामतेकर, प्रकाश भोसले, सतीश वाईरकर, सुनील गुराम, दादा मिठबावकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page