मालवणात २६ रोजी मालवणी कविता सादरीकरण

मालवण ता.०९-:* मराठी राजभाषा दिनानिमित्त येथील श्री शिवाजी वाचन मंदिरतर्फे २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत येथील भरड दत्त मंदिर येथे ‘मालवणी कविता’ सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या कवितेतून कोकणी ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारे प्रसिद्ध कवी दादा मडकईकर आणि कोकणी लोकांची जीवनशैली व व्यवस्था मांडणारे मालवणी कवी रुजारिओ पिंटो यांच्या कविता सादर होणार आहेत.

You cannot copy content of this page