सावंतवाडी ता 8: सावंतवाडीचे सुपुत्र डाॅ. हरी शिवराम ऊर्फ भाऊ परुळेकर यांची १२५ वी जन्मशताब्दी साजरी करण्यात आली. राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय रुग्णालयात त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाऊसाहेबांच्या आठवणींना उजाळा देताना उपस्थितांना भावना अनावर झाल्या. स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रीमंडळात थेट आरोग्यमंत्री पदाची ऑफर असताना केवळ आपल्या मायभुमीतील तळागाळातील जनतेची सेवा करता यावी या तीव्र इच्छेपोटी ती ऑफर नम्रपणे नाकारणारी ही व्यक्ती होती. सावंतवाडी संस्थान परिसरातील जनतेला त्यांनी वैद्यकीय सेवा दिली. सर्वसामान्य गरिबांसाठी रुग्णसेवा देत शैक्षणिक क्षेत्रात बहुमूल्य कार्य करणारे भाऊ परुळेकर यांनी महात्मा गांधी यांच्यावर सुद्धा उपचार केले होते. डाॅ. भाऊ परुळेकर यांचा जन्म ८ फेब्रुवारी १८९८ ला सावंतवाडी येथे झाला. आज त्यांची १२५ वी जयंती असून यानिमित्त त्यांना राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय रुग्णालयात आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थितांनी आपली मनोगत व्यक्त केली.
यावेळी भाऊसाहेबांच्या आठवणींना उजाळा देत असताना त्यांचे नातू बालरोगतज्ञ डॉ. जयेंद्र परुळेकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉ. अरविंद खानोलकर, जनरल प्रॅक्टिशनल ज्येष्ठ डॉ. श्रीपाद कशाळीकर भावूक झाले. यावेळी ज्येष्ठ डॉ. श्रीपाद कशाळीकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉ. अरविंद खानोलकर, राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर, उपाध्यक्ष विकास सावंत, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, बालरोगतज्ञ डॉ. जयेंद्र परुळेकर, डॉ. मिलिंद खानोलकर, ज्येष्ठ नेते अनिल परुळेकर, डॉ. राजेश नवांगुळ, डॉ. शंतनू तेंडुलकर, डॉ. दत्तात्रय सावंत, डॉ. अमोल पावसकर, डॉ. लीना परूळेकर, डॉ. विजया चिंडक, डॉ अमृता स्वार, रमेश पै, बाळासाहेब बोर्डेकर, डॉ. प्रविण कुमार ठाकरे, डॉ. ललीत विठलानी, दादा मडकईकर, डॉ. कशाळीकर, डॉ. दीप चोडणकर, रवी जाधव आदी डॉक्टर, प्रतिष्ठित नागरिक, परुळेकर कुटुंबिय उपस्थित होते.
