तहसीलदारानी ठोठावला 1 लाख 29हजार 520 रुपयाचा दंड…
मालवण ता.०८-:* वाळूची विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी काल मालवण कुंभारमाठ जरीमरी घाटी येथे महसूल विभागाने पकडलेल्या डंपरच्या मालकावर मालवण तहसीलदारांनी दंडात्मक कारवाई करत १ लाख २९ हजार ५२० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
रविवारी सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास मालवण कुंभारमाठ येथील जरीमरी घाटीतून वाळूची विनापरवाना वाहतूक करणारा एमएच ०६ बी.डी. ०९९४ या क्रमांकाचा डंपर महसूल विभागाच्या पथकाने पकडून तहसील कार्यालय परिसरात आणून ठेवला होता. या डंपर मध्ये दोन ब्रास वाळू सापडून आली होती. विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी डंपर मालक जितेंद्र वसंत पाटील यास दंडात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात आली. त्यानुसार तहसीलदारांनी दंडात्मक कारवाई करत डंपर मालकास दंड ठोठावला आहे.
