वैभववाडी प्रतिनिधी यशवंतराव चव्हाण विदयालय आचिर्णे या माध्यमिक विदयालयाचे शिक्षक अशोक महादेव ठोंबरे वय ५७ यांचे आकस्मिक निधन झाले आहे.त्यांच्या मृत्यूची खबर त्यांचा मुलगा विनयकुमार ठोंबरे वय २४ रा. माळवाडी ता.पलूस जि.सांगली यांनी वैभववाडी पोलिस ठाणेत दिली आहे.
मयत अशोक ठोंबरे हे आचिर्णे येथील यशवंतराव चव्हाण विदयालयात शिक्षक म्हणून गेली पाच वर्षे कार्यरत होते.मूळ गाव माळवाडी ता.पलूस जि.सांगली असून आचिर्णे येथे भाड्याने एकटेच राहात होते.मंगळवारी सकाळी ९.३० वा.सुमारास त्यांच्या शाळेचे शिपाई त्यांना शाळेत नेण्यासाठी आले असता, त्यांना ते खोलीत निपचित पडलेले दिसून आले.त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलावले तर ते मृत झाल्याचे लोकांच्या लक्षात आले.याबाबत त्यांच्या कुटुंबीयांना माहीती देण्यात आली.त्यांना दारु पिण्याची सवय होती.तसेच उच्च रक्तदाबाचाही ञास होता.त्यातच त्यांचा मृञू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ३१ मे ला ते सेवानिवृत्त होणार होते.तर त्यांच्या मुलाचे लग्न २१ फेब्रुवारीला होणार आहे.त्यांच्या आकस्मिक निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
