माता रमाईच्या कष्टाची व त्यागाची जाणिव प्रत्येक स्त्रीने ठेवली पाहिजे…

रमाई महिला मंडळ अध्यक्षा तथा माजी समाज कल्याण सभापती शारदा कांबळे यांचे प्रतिपादन…

वैभववाडी प्रतिनिधी डाॕ.बाबासाहेबांना माता रमाईची खंबीर साथ लाभल्यामुळेच ते देशासाठी ऐवढे मोठे योगदान देऊ शकले. माता रमाईच्या कष्टाची व त्यागाची जाणीव प्रत्येक स्ञीने ठेवली पाहीजे.असे प्रतिपादन माता रमाई महीला मंडळाच्या अध्यक्षा तथा समाज कल्याण माजी सभापती शारदा कांबळे यांनी केले.

वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ यांच्यावतीने डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक वैभववाडी येथे माता रमाआई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी कांबळे बोलत होत्या.यावेळी संघाचे अध्यक्ष भास्कर जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे, संतोष कदम, धर्मरक्षित जाधव, सचिव रवींद्र पवार, प्रा.कांबळे,ऋचा पवार, प्रमोद जाधव, मंगेश कांबळे , मनस्वी कांबळे ,वासंती तानवडे, गिता कदम, प्रज्ञा जाधव, उर्मिला जाधव आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूञसंचलन शरद कांबळे तर आभार प्रमोद जाधव यांनी मानले. फोटो- माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करतांना सेवा संघाचे पदाधिकारी . छाया- संजय शेळके वैभववाडी

You cannot copy content of this page