देवली गावातील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील देवली गावात मंजूर केलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते पार पडला. गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे मंजूर केल्याबद्दल देवलीतील ग्रामस्थांनी आम. वैभव नाईक यांचे आभार मानले.

यामध्ये देवली ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण, देवली स्मशानभूमी ते पिरकुली जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ५ लाख, भगवती मंदिर परिसर सुशोभीकरण करणे निधी ५ लाख, देवली वाघवणे ग्रा.मा. ४११ खडीकरण डांबरीकरण करणे निधी ५ लाख, खालची देवली भगवती मंदिर खाणेतरवाडी रस्ता ग्रा. मा. ४२१ संरक्षण भिंत बांधणे निधी ५ लाख, प्रमुख राज्य मार्ग ०४ पासून देवली चिंचेचा वहाळ बंडावाडा ते बावखोल मार्ग ग्रा.मा. ४१५ डाबंरीकरण करणे निधी १० लाख, देवली बोवलेकर वाडी नळ योजना विस्तारीकरण करणे १ लाख, देवली वाघवणे येथील सातेरी मंदिराजवळ स्मशानशेड बांधणे निधी ३ लाख, गोवेकर मांगर ते गावराखा रस्ता डांबरीकरण करणे (निधी ५ लाख) आदी कामांचा समावेश आहे. कुडाळ मालवण तालुक्यात अनेक विकास कामे मंजूर केली असून प्रत्यक्षात कामे सुरु झाली आहेत. उर्वरित कामे येत्या काळात मार्गी लावली जाणार आहेत. लोकांच्या तक्रारी येता नये यासाठी ठेकेदारांनी देखील दर्जेदार कामे करावीत, असे आवाहन आ. वैभव नाईक यांनी यावेळी केले. याप्रसंगी देवली येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, सरपंच गायत्री चव्हाण, उपसरपंच भाऊ चव्हाण, शाखाप्रमुख सचिन मालवणकर, शामा वाघकर, रामू चव्हाण, बबलू चव्हाण, शिवदास चव्हाण, शामा मेस्त्री, विजय चव्हाण, सुरेश नाईक संतोष आचरेकर, गणेश मयेकर, भूषण बोवलेकर, पप्पू पेडणेकर, बाळा कोळंबकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page