प्रलंबित नळपाणी योजना 22 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण न झाल्यास पंचायत समिती समोर उपोषण…

भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अभिजित पवार यांचा उप अभियंता यांना इशारा…

वैभववाडी प्रतिनिधी एडगांव पवारवाडी येथील प्रलंबीत नळपाणी योजना येत्या २२ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण केली नाही.तर पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा एडगांव ग्रामस्थांच्यावतीने भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत पवार यांनी उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

एडगांव पवारवाडी नळ पाणी योजना गेली दहा वर्ष अपूर्ण अवस्थेत असून सद्यस्थितीत काम अर्धवट आहे.सध्या पाणीपुरवठा होत असलेली टाकी ही चाळीस वर्षे जुनी असून ती आता जवळपास मोडकळीस आलेल्या आहे. त्यातून पाणी झिरपून वाया जात आहे. सदर योजना पूर्ण करण्यासाठी आपणास ग्रामस्थांकन वारंवार पत्रव्यवहार केला आहे. बैठका, ग्रामसभा, पालकमंत्री यांच्या उपस्थितीत तसेच विद्यमान आमदार यांनी विधानसभेत प्रश्‍न उपस्थित करून सुद्धा ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कणकवली शाखा वैभववाडी यांनी या योजनेबाबत कुठलीही दखल आजपर्यंत घेतलेली नाही.

सदर अपूर्ण सोडलेली नळ योजना पूर्ण होणे करता 15 ऑगस्ट 2021 रोजी आम्ही ग्रामस्थ उपोषण करणार होतो. परंतु आपण उपोषण करू नये म्हणून शंभर रुपयाच्या बॉंडपेपरवर आम्ही दोन महिन्यात काम पूर्ण करून देतो आपण उपोषण करू नये असे लेखी हमी आम्हाला आपल्या विभागाने दिली होती.यावर विश्वास ठेवून आम्ही प्रशासनास या वेळी सहकार्य केले होते. आता लेखी हमी देऊन चार महिने उलटले तरी सदर योजनेचे काम अदयाप सुरु झालेले नाही. ठेकेदाराचे नाव सांगून टाळाटाळ केली जात आहे.

तरी ग्रामस्थांची अशी मागणी आहे की ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून अर्धवट काम पूर्ण करावे व जल जीवन मिशन अंतर्गत कामाला तात्काळ मंजूरी देण्यात यावी.अर्धवट स्थितीत असलेले काम दिनांक 22 फेब्रुवारी 2022 पर्यंत पूर्ण करावे. अन्यथा पंचायत समिती वैभववाडी समोर ग्रामस्थांसमवेत उपोषण करावे लागेल असा इशारा ग्रामस्थांच्यावतीने भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अभिजित पवार यांनी दिला आहे दिला आहे.यावेळी ग्रा.प.सदस्या चेतना पवार, रामदास पवार, सौ.नेहा पवार,अर्चना फाळके, रवी पवार, शैलेश रावराणे, आदित्य पवार आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page