त्यांना’ जनताच जागा दाखवून देणार

आम. दीपक केसरकर यांचा हल्लाबोल;विरोधकांनी जनतेची दिशाभूल केल्याचा केला आरोप

सावंतवाडी : विरोधकांनी गेल्या दोन वर्षात शहरात काय दिवे लावले ते जनतेसमोर आहे. मी दिलेल्या निधीतून मंजूर झालेल्या कामांची भूमिपूजने करून जनतेची दिशाभूल केली. अशा वाचाळविरांच्या टिकेला मी उत्तर देणार नाही. पण सज्ञान जनता नक्कीच त्यांना जागा दाखवून देईल, असा हल्लाबोल माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

आमदार केसरकर म्हणाले, नाट्यगृह, काझी शहाबुद्दीन हॉल, गार्डनची कंपाऊंड वॉल या कामांना मी निधी दिला. सावंतवाडीला बोट प्रकल्प २५ वर्षापूर्वी स्थापन झाला. त्यातील काही बोटी पडून आहेत. विरोधकांनी घेतलेल्या मशीनचा आवाज मोठा येतो. यामुळे त्या बोटी चालवू नयेत, असे पत्र न्यायालयाने नगरपरिषदेला दिले आहे. मुख्याधिकारी यांनी ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त स्तुत्य उपक्रम राबविला. गेल्या पाच वर्षात ३५ ते ४० कोटीचा निधी मी दिलेला आहे. सावंतवाडीच्या सर्व प्रकल्पांना १०० टक्के निधी दिला आहे. बँ. नाथ पै नाट्यगृह विरोधकांमुळेच आज बंद आहे. अशा लोकांवर बोलणे गरजेचे नाही.

मी कोट्यवधीचा निधी देतो, ते योग्य तऱ्हेने खर्च झाला पाहिजे. आमचे नगराध्यक्ष असताना सुद्धा अंडरग्राउंड इलेक्ट्रिसीटीसाठीचे दिलेला निधी परत गेला. हा जनतेचा पैसा असून त्याचा योग्य वापर झाला पाहिजे.  ४० हजारात पेडलची बोट येते. दोन ते तीन लाखात इंजिनची बोट येते. त्याला दहा लाख लागल्यास पैसा जनतेचा जातो. ५० लाख एटीएमसाठी दिले असताना ३५ लाख रुपये कोणीतरी खाल्ले तर ते योग्य नाही. एखाद्या व्यक्तीने हे पैसे खाल्ले असे मला म्हणायचे नसून ठेकेदार किंवा कुठेतरी पैसे फुकट घालवले ही वस्तुस्थिती आहे. हे लोक वय आणि अनुभवाने लहान आहेत. त्यांना निधी कसा आणायचा असतो हे ठाऊक नाही. शहरात क्रीडा संकुल, उद्यान, बोटिंग, टुरिस्ट रिसेप्शन सेंटर, शिल्पग्राम, हेल्थ पार्क, नाट्यगृह, व्यापारी संकुल आदी प्रमुख प्रकल्प माझ्या कारकिर्दीत झालेत. त्यानंतरच्या काळात तेवढ्याच वेगाने प्रगती होण आवश्यक आहे. तसें होत नसेल तर त्यात लक्ष घालावे लागते. त्यामुळे कोणाच्या पोटात दुखायचे कारण नाही. आमदार म्हणून तो माझा अधिकार आहे. ३० वर्षापूर्वी सावंतवाडी हे राज्यातील सर्वोत्कृष्ट शहर होते. पुन्हा ‘क’ वर्गात नंबर १ करणे हे माझे कर्तव्य आहे. सावंतवाडीत गेल्या दोन वर्षात काहीही झाले नाही. जी कामी मी केली, त्याची उद्घाटने करणे, आपले बोर्ड लावणे अशी कामे विरोधकांनी केली. त्यावर मी कधी बोललो नाही. नगरपरिषद हे माझ घर आहे. सत्ता कुणाचीही असो, पुन्हा एकदा सावंतवाडीला नंबर १ करण्यावर भर देणार आहे. आज ज्याचे कौतुक होतेय ते २५ वर्षापूर्वी आम्ही केलेले आहे. नवीन लोकांनी माहिती घेऊन बंद प्रकल्प कार्यन्वित केले पाहिजेत. शहराला पाणी पुरवठा दोनवेळा होत होता, आता एकदाही नीट होत नाही. ग्रामीण भागाचे पाणी बंद पडले आहे. हे कुणाच्या कारकिर्दीत घडले? ग्रामीण भागात पाणी देणे ही आपली जबाबदारी आहे. नगरपालिका कायद्यात  हे नमूद आहे. हे कर्तव्य पार पडायला आपण कमी पडत असू तर लक्ष घातलेच पाहिजे आणि ते मी घालणार. त्यामुळे त्यावर कोण टीका करत असेल तर उत्तर देणे माझी जबाबदारी नाही. सावंतवाडी आणि वेंगुर्ला ही दोन मोठी शहरे असून त्यांना प्रगतीपथावर ठेवण्यासाठी प्रयत्न असणार आहे. दोडामार्ग हे शहर लहान आहे. त्याच्या गरजा वेगळ्या आहेत. सत्ता नसली तरी मोठ्या प्रमाणात निधी दिला असून विकासात कोणताही खंड पडणार नाही.  चांद ते बांदा ही योजना पुन्हा नव्याने ‘रत्नसिंधू’ या नावाने सुरु होत आहे. थेट जनतेशी संवाद साधुन यात त्यांना सहभागी केले जाणार आहे. सावंतवाडीच्या विकासाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी ‘जनसंपर्क मोहीम’ राबविणार असून युवकांनी यात पुढाकार घ्यावा. पुढच्या काळातील सुंदरवाडीसाठी युवा शक्ती जागृत झाली पाहिजे.

निधी देऊन काम शिल्लक असतील आणि त्यात आमचेही पदाधिकारी असतील तर त्यांनीही  आत्मपरीक्षण करून सुधारावे. मागील दोन वर्षात काय झाले याचा सावंतवाडीच्या जनतेने विचार करायला पाहिजे.ज्यांना काहीच कळत नाही त्यांना सत्ता दिली तर काय होणार ? याचा विचार नागरिकांनी करावा. ‘संजू परब’ हे नाव माझ्या शब्दकोशातून मी डिलीट केले असून योगायोगाने त्यांना संधी मिळाली. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, अनारोजीन लोबो, श्वेता शिरोडकर, पल्लवी केसरकर, अँँड. दिलीप नार्वेकर यांनी यांच्यापेक्षा खूप चांगले काम केले आहे. त्यांनी कोणते विधान केले का ? त्यामुळे कुणाला किती महत्व द्यायचे याला मर्यादा आहेत. ‘त्यांचा’ भूतकाळ पहा आणि त्याबद्दल त्यांना विचारा, मला विचारू नका. अशा लोकांची माझ्यावर बोलण्याची लायकी नाही. एवढा आम्ही त्याग केलेला आहे. लोकशाहीत बोलण्याचा हक्क आहे. परंतु ज्यांनी काम करून दाखवल त्यांनीच बोलावे. ज्यांना काहीही करता आले नाही

You cannot copy content of this page