कणकवली नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळातर्फे लतादीदी यांना आदरांजली

कणकवली 8 फेब्रुवारी (प्रतिनिधी)-नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळातर्फे (जुना भाजीपाला मार्केट, आप्पासाहेब पटवर्धन चौक) गानसम्राज्ञी, भारतरत्न लतादीदींना यांना आदरांजली अर्पण करण्यात आली

नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ, आपण आहात म्हणून आम्ही,ॐ नमो भगवते भालचंद्राय यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रध्दांजली च्या वेळी “मेरी आवाज ही पहचान हैं गर याद रहे” “रहे ना रहे हम महेका करेंगे” “तुम मुझे युॅं भुला ना पावागे ” “सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या”” अखेरचा हा तुला दंडवत ” असे सहजगत्या गाऊन जाणाऱ्या लतादीदी काल गेल्या आणि समस्त भारतीयांना व जगभरातील कानसेन जनतेला वास्तवाची जाणीव झाली. असा सुर व स्वर पुन्हा होणे नाही असे प्रतिपादन पत्रकार विजय गावकर यांनी केले.

कणकवलीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनीही आदरांजली वाहताना “लतादीदी चे जाणे तमाम भारतीयांना आपल्या परिवारातीलच कोणी गेले आहे” अशा पद्धतीने जिव्हारी लागले, यातच त्यांचे अलौकिकत्व दिसुन येते.

जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर म्हणाले, “वयाच्या ७ व्या वर्षापासून वयाच्या ९२ व्या वर्षापर्यंत सातत्याने ८५ वर्षे गान रसिकांच्या हृदयावर राज्य करणे” ही सोपी गोष्ट नाही पण “लतादीदीनी ते करुन दाखविले आणि सिने संगीताला एक वेगळाच दर्जा प्राप्त करून दिला. ” भारतीय लोक जीवनातील जिवंत दंतकथा दोन अक्षरांचा दैवी सुर भारतरत्न लतादीदी “अशा शब्दात राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी आदरांजली वाहीली

You cannot copy content of this page