कणकवली ता.०८-:* सकल मराठा समाज,कणकवलीच्यावतीने शिवजयंती उत्सव छत्रपती शिवाजी महाराज चौक, पंचायत समिती जवळ , कणकवली येथे शनिवार १९ फेब्रुवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आला आहे .शिवजयंती निमित्त खालील स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
स्पर्धा क्र .१-जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा,गट व विषय खालीलप्रमाणे गट क्र .१-इ .५ वी पर्यंत -शिवरायांच्या स्वराज्य जडणघडणीतील एक प्रसंग,गट क्र .२-इ .६वी ते ८ वी- मी किल्ला/दुर्ग बोलतोय,गट क्र .३-९ वी ते १२ वी-छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती आणि गनिमी कावा,गट क्र.४-महाविद्यालयीन गट,शिवरायांचं व्यापारी आणि शेती धोरण असे विषय गटनिहाय देण्यात आले आहेत. बक्षिसे रोख खालीलप्रमाणे प्रथम -१००० रुपये,द्वितीय-७०० रुपये,तृतीय-५००रुपये देण्यात येणार आहे.वक्तृत्व स्पर्धा सकाळी ११ .०० वाजता सुरू होईल.वक्तृत्व स्पर्धा वेळ मर्यादा खालील प्रमाणे-गट क्र .१- ४ते५ मिनिटे,गट क्र .२- ५ते ६ मिनिटे,गट क्र .३- ६ते ७ मिनिटे,गट क्र.४- ६ ते ७ मिनिटे असणार आहे.नाव नोंदणीसाठी संतोष देसाई-9405328242,सचिन सावंत -9021858597 यांच्याशी संपर्क करावा. स्पर्धा क्र.२चित्रकला स्पर्धा गट-अ इयत्ता ५ वी पर्यंत-विषय-सिंधुदुर्ग किल्ला किंवा शिवाजी महाराज,गट -ब इयत्ता ६ वी ते ८ वी.विषय-शिवाजी महाराजांचे सिंहासन आरूढ व्यक्तिचित्र किंवा माझा आवडता किल्ला,रोख बक्षिसे खालीलप्रमाणे गट अ व ब साठी प्रथम-५००,द्वितीय-३००,तृतीय-२०० रुपये असणार आहेत.सदर चित्रकला स्पर्धा सकाळी ११.३० ते १.०० या वेळेत होईल.चित्रकला स्पर्धेसाठी नाव नोंदणी हेमंत राणे-9404169984, संतोष राणे-9881104804 यांच्याशी संपर्क साधावा.स्पर्धेचे ठिकाण-छत्रपती शिवाजी महाराज चौक,(पंचायत समिती जवळ)कणकवली आहे.नाव नोंदणी १७ फेब्रुवारी २०२१ पर्यत करावी,सर्व विजेत्यांचे बक्षिस वितरण स्पर्धा संपल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात येतील . बक्षिसाचे स्वरूप सन्मानचिन्ह , रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येईल.तरी जास्तीत जास्त मुलांनी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन सकल मराठा समाज, कणकवली यांनी केलं आहे.
