असलदेतील शेतकऱ्यांच्या हिताचे काम करणार

चेअरमन भगवान लोके यांचा शेखर सोनार यांच्या हस्ते सत्कार

कणकवली ८ फेब्रुवारी (प्रतिनिधी)– आपण दिलेला आशीर्वादांमुळे मी जीवनात यशस्वी झालो आहे. तुम्ही दिलेले प्रेम मी कदापि विसरणार नाही.तुमच्या सर्वांच्या सहकार्याने या पदापर्यंत पोहोचलो आहे.या सत्काराने माझी निश्चितच जबाबदारी वाढली आहे.असलदे सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणार असल्याचा विश्वास असलदे सोसायटी चेअरमन, पत्रकार भगवान लोके यांनी व्यक्त केला.

असलदे उगवतीवाडी येथील ब्राम्हणदेव सेवा मंडळाच्यावतीने, गणेश जयंती उत्सवानिमित्त असलदे विकास सोसायटी नूतन चेअरमनपदी भगवान लोके यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन समाजसेवक शेखर सोनार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी माजी अध्यक्ष बबन हडकर,माजी सरपंच लक्ष्मण लोके,सुरेश लोके,गणेश लोके,पंकज आचरेकर,रामचंद्र जेठे,प्रदीप हरमलकर,राकेश आचरेकर,संदेश आचरेकर,दयानंद डगरे,सचिन लोके,नितीन आचरेकर, महेश लोके,दिवाकर डगरे,,प्रकाश आचरेकर,विश्राम लोके,अनिल लोके,चंद्रकांत जेठे,राजू जेठे,दिनेश जंगले,विष्णू डगरे,विजय आचरेकर,विशाल जेठे,संजय जेठे, सचिन हरमलकर, मनोज लोके,जितेंद्र लोके,सुरेश जेठे,अनिल कोठारकर,प्रशांत लोके आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page