जे करायचे ते इथेच फेडायचे अशी झाली राणेंची अवस्था

कणकवली ता.०८-: कोकण भूमीत जे उन्मत्त होतात त्यांना या कोकणच्या परशुराम भूमीत गाडले जाते. राणे समर्थकांनी २००५ मध्ये सत्तेचा माज करत शिवसैनिकांना केलेली मारझोड, बाहेरून आणलेल्या गुंडांकडून जी दहशत पसरवली होती. त्यावेळी जुने प्रामाणिक काँग्रेस कार्यकर्त्यानी पक्ष बदलला तर काहींनी राजकारण सोडले. आज राणेंच्या दहशतीचे समर्थन करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारे टिकाटिपणी करत आहेत. ही टीका करणारे रमेश गोवेकरच्या गायब होण्याचे गूढ सांगतील काय ? असा सवाल मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी केला.

कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री,प्रशांत उपरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. माजी परशुराम उपरकर म्हणाले,नितेश राणे यांनी नव्याने स्वाभिमान संघटना आणत गुंड आणले,त्यांना निवडुन कोणी आणले?त्याचा विचार करण्याची गरज आहे.प्रमोद जठार यांच्या निवडणुकीत जे टीका करणारे त्यांचेच गोडवे गात आहेत.नितेश राणे व नारायण राणे यांचे प्रमोद जठार आता गोडवे गात उदोउदो करत असल्याची टीका परशुराम उपरकर यांनी केली.

कोकणातील हे नेते कधी या पक्षात तर कधी त्या पक्षात गेले.त्यावेळी मार खाणारे तुमचे कार्यकर्ते नव्हते का?२००५ सालात शिवसेनेचे काम करणारे पक्षात बाजूला गेलेत.राणेंसोबत होते ते आज शिवसेनेत काम करत आहेत.स्वार्थासाठी कोणत्या पक्षात जातील,त्याचा भरवसा नाही. कोकणातील जनतेला फसवण्याचा प्रयत्न करणारे सोयीनुसार पक्षबदल करून टीका करतात. मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी कोणी जिल्हा बँक अध्यक्ष तर कोणी महामंडळाचे उपाध्यक्ष पद मिळवणारे त्यावेळी राणेंचे गोडवा गात होते. त्यामुळे सिंधुदुर्गातील जनतेने एकमेकांवर टीका करणाऱ्या स्वार्थी राजकारण्यांना धडा शिकवला पाहिजे, असे उपरकर म्हणाले. कोकण ही परशुरामाची भूमी असून या परशुरामाच्या भूमीत जे करायचे ते इथेच फेडायचे, असे उपरकर म्हणाले.

You cannot copy content of this page