तीन बहुमोल रत्ने गमावली

दीपक केसरकर;सावंतवाडीत लतादीदी, सुधीर कलिंगण, पुरुषोत्तम पै यांना आदरांजली

सावंतवाडी : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी कलाक्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही बहुमोल कार्य केले. समस्त भारतीयांच्या हृदयात त्यांचे स्थान अढळ आहे. कोकणरत्न, ‘लोकराजा’ सुधीर कलिंगण यांचे दशावतार क्षेत्रातील योगदान फार मोठे आहे. त्यांच्या निधनाने दशावतार कलेतील तारा हरपला आहे. तर अँड. पुरूषोत्तम पै अर्थात राया पै यांनी वकिलीबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले. या तीन बहुमोल रत्नांना आपण मुकलो आहोत, अशा भावना आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त करून आदरांजली अर्पण केली.

भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर, कोकणरत्न ‘लोकराजा’ सुधीर कलिंगण, कै. अँड. पुरूषोत्तम पै यांना सावंतवाडी नगरषरिदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विधानसभा विशेष हक्क समिती प्रमुख व माजी गृहराज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी यावेळी या रत्नांना आदरांजली वाहिली‌. लता मंगेशकर, सुधीर कलिंगण यांच्या स्मृतीना उपस्थितांनी उजाळा दिला. यावेळी प्रशासक प्रशांत पानवेकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, अँड. सुभाष पणदुरकर, माजी आरोग्य सभापती अँड परिमल नाईक, माजी नगरसेवक बाबु कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, दिपाली भालेकर, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, संगीतप्रेमी किरण सिद्धये, श्रीपाद चोडणकर, सुधिर धुमे, शंकर प्रभू, अँड. पी.डी. देसाई, किशोर सावंत, प्रतिक बांदेकर लायन्स क्लब, रोटरी क्लबचे पदाधिकारी, पत्रकार, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page