संध्या प्रसादी यांचा भाजपात प्रवेश;चर्चांना उधाण

दोडामार्ग ता.०७सुमित दळवी-:* कसई दोडामार्ग नगर पंचायतीच्या अपक्ष नगरसेवक संध्या राजेश प्रसादी यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.भाजपा नेते केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीत ओम गणेश निवासस्थांनी हा प्रवेश करण्यात आला. कसई दोडामार्ग नगरपंचायत मध्ये भाजपाचे १३ सदस्य निवडून आले आहेत.

प्रसादी या अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत त्यांनी आज भाजपा मध्ये प्रवेश केल्याने ही संख्या १४ वर पोचली आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत संध्या प्रसादी यांना भाजपात प्रवेश झाला त्यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली,जि. प उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे,माजी जि. प उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी,अमित प्रसादी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page