गावठणवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ…

सरपंच दर्शना पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

वैभववाडी प्रतिनिधी कुर्ली गावठणवाडी रस्ता कामाचा शुभारंभ शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, जिल्हा परिषद सदस्या दिव्या पाचकूडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुर्ली सरपंच दर्शना पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. ‌‌ हे काम जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा अंतर्गत मंजूर करण्यात आले होते.

कुर्ली ग्रामपंचायतच्या मागणीनुसार जिल्हा नियोजन समिती सदस्य अतुल रावराणे यांनी या कामासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला. कुर्ली गावठणवाडी रस्ता गेली अनेक वर्षे नादुरुस्त अवस्थेत होता.

यासाठी कुर्ली गावचे माजी उपसभापती तथा उपसरपंच अंबाजी हुंबे, सरपंच दर्शना पाटील, माजी सरपंच नलिनी पाटील व ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच हे काम मार्गी लागले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्या दिव्या पाचकूडे यांनी आपल्या स्वनिधीमधून गटाराच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला त्याही कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी माजी उपसभापती अंबाजी हुंबे, जिल्हा कार्यकारणी सदस्य संभाजी रावराणे, माजी सरपंच नलिनी पाटील, ग्रामपंचायत सदस्या उर्मिला सावंत, माजी सरपंच सुर्यकांत पाटील, माजी उपसरपंच सुर्यकांत परब, विजया पवार, प्रदीप पाटील, महिला शाखाप्रमुख सुलोचना राऊत, तुळशीदास पाटील, दीपक राणे, चंद्रकांत कुलकर्णी, वासुदेव पाटील, काका पवार, अंकुश पाटील, सुरेश पडवळ, संतोष बोडके, रोहन रावराणे आदी शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page