खांबाळे टेंबवाडी व धनगरवाडी येथील रस्त्याच्या खडीकरणाच्या कामाचा शुभारंभ…

शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या हस्ते शुभारंभ…

वैभववाडी प्रतिनिधी खांबाळे टेंबवाडी ग्रामीण मार्ग-99 व खांबाळे धनगरवाडी मुख्य रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे या कामांच्या नुतनीकरनाचा शुभारंभ शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जेष्ठ ग्रामस्थ अशोक पवार व खांबाळे सरपंच गौरी पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

खांबाळे टेंबवाडी, धनगरवाडी या रस्त्यासाठी येथील ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी या रस्त्यांसाठी सातत्याने पालकमंत्री उदयजी सामंत व खासदार विनायकजी राऊत यांच्याकडे पाठपाठपुरावा करून या दोन्ही रस्त्यांना 10 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. त्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपसरपंच गणेश पवार, माजी सरपंच विठोबा सुतार, सारिका सुतार, माजी चेअरमन दीपक चव्हाण, पांडुरंग शेळके, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण गायकवाड, प्राजक्ता कदम, रामदास पवार, प्रमोद लोके, दीपक पवार, लवू पवार, विलास मोहिते, गंगाराम अडुळकर, सत्यवान सुतार, हरिश्चंद्र पवार, राजेंद्र पवार, जयेश पवार, सुदर्शन गुरव, मेघनेश पवार, सुनिल गुरव, राजू शेळके, अंबाजी पवार, संकेश पवार, सागर पवार, मुकेश पवार, किशोर सुतार आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page