आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण प्रभाग क्र.६ मध्ये ५० लाखाचा निधी मंजूर…

सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई आणि माजी नगरसेविका आकांक्षा शिरपुटे यांनी केला सत्कार…

मालवण दि प्रतिनिधी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून मालवण नगरपालिकेच्या प्रभाग क्र. ६ मध्ये नुकताच तब्बल ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे येथील विकास कामांना चालना मद्दल सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई आणि माजी नगरसेविका आकांक्षा शिरपुटे यांनी आमदार वैभव नाईक यांचा सत्कार केला.

मालवण नगरपालिका प्रभाग क्र. ६ मधील भरड ते गवंडीवाडा जोड रस्ता मजबुतीकरण डांबरीकरण आणि वॉलच्या कामासाठी ४० लाख रुपये मंजूर झाले असून इतर कामांसाठी १० लाख असा भरघोस निधी आमदार वैभव नाईक यांनी मंजूर करून आणला आहे. याबद्दल आमदार वैभव नाईक यांचे अमेय देसाई आणि आकांक्षा शिरपुटे यांनी आभार मानले. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, युवा सेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, उपशहर प्रमुख सन्मेश परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page