भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांचा आमदार दीपक केसरकर यांना सवाल..
सावंतवाडी ता.०७-:* दहशतवाद – दहशतवाद म्हणून नेहमी ओरडणाऱ्या आमदार दीपक केसरकर यांना पुणे येथे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यातील दहशतवाद दिसला नाही का? असा सवाल भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी उपस्थित केला आहे.
नेहमी दहशतवादावर बोलणारे आमदार दीपक केसरकर शिवसैनिकांनी केलेल्या या दहशतवादी हल्ल्यावर गप्प का? आमदार दीपक केसरकर यांचा दहशतवादावर मोठा अभ्यास असल्याने त्यानी या दहशतवादी हल्ल्यावर स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी आमदार दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.
