गटारीचे काम पूर्ण करा, अन्यथा ‘घेराव’

शब्बीर मणियार यांचा इशारा;बांधकाम पर्यवेक्षकांना धरले धारेवर

सावंतवाडी ता.०७-:* येथील बाहेरचावाडा रिक्षा स्टँड जवळील वळणावर गटाराच्या करण्यात आलेल्या अर्धवट कामाबद्दल बांधकाम पर्यवेक्षक शिवप्रसाद कुडपकर यांना घटनास्थळी बोलावत शिवसेना उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार यांनी धारेवर धरत चांगलेच खडेबोल सुनावले तर येत्या दोन दिवसात अर्धवट स्थितीतील ते धोकादायक काम पूर्ण न केल्यास नागरपालिकेवर घेराव घालू असा इशारा यावेळी दिला.

बाहेरचावाडा येथून कुणकेरीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या प्रवेशद्वारावरच असलेल्या गटाराच्या दुरुस्तीचे काम गेल्या महिन्याभरापूर्वी नगर पालिकेकडून करण्यात आले मात्र गटारावर स्लॅब घालून महिना उलटून गेला तरी देखील संबंधित ठेकेदाराकडून स्लॅबच्या बाजूने खचलेला भाग सुस्थितीत करण्यात आला नाही रस्त्याच्या मधोमध निर्माण झालेल्या या अडथळ्यामुळे 2 युवती देखील दुचाकी वरून पडून अपघात झाला तर निर्माण झालेल्या खड्यामुळे रास्ता अरुंद झाला असून मोठी वाहने आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे यामुळे आज आक्रमक झालेल्या स्थानिक नागरिकांसह शिवसेना उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार यांनी नगरपालिकेच्या बांधकाम पर्यवेक्षक यांना घटनास्थळी बोलावत ठेकेदाराचे अपूर्ण स्थितीतील धोकादायक असलेले काम निदर्शनास आणून दिले तर मणियार यांनी श्री कुडपकर यांना धारेवर धरत खडेबोल सुनावले ठेकेदारांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली यावेळी संबंधित ठेकेदाराला योग्य त्या सूचना देऊ असे आश्वासन श्री कुडपकर यांनी दिले येत्या दोन दिवसात हे अर्धवतस्थितीतील धोकादायक काम पूर्ण न झाल्यास पालिकेवर घेराव घालू असा इशारा यावेळी श्री मणियार यांनी दिला

यावेळी रिक्षा स्टॅन्ड चे अध्यक्ष खलील खान, शौकत शेख, मुबारक मुल्ला, रजाक नाईक, अल्ताफ खान, नुमान आगा आदी बाहेरचवड्यातील नागरिक उपस्थित होते

You cannot copy content of this page