सावंतवाडी शहराला पुन्हा सुखाचे दिवस येतील

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर : तुतारीचा शुभारंभ

सावंतवाडी ता.०४-: येथील शहराला पुन्हा एकदा परतून सुखाचे दिवस येतील निश्चितच शहरात मोठ्या दिमाखाने व शहर इच्छेप्रमाणे विकास कामे होतील असे मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथील तुतारीच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले .

यावेळी माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, माजी नगरसेवक अनारोजीन लोबो, सुरेंद्र बांदेकर, सुरेश भोगटे, विलास जाधव, रवी जाधव, संजय पेडणेकर, मुकुंद वझे, दत्तप्रसाद गोठसकर, शिवप्रसाद कुडपकर, डॉ. मधुकर घारपुरे, अर्षद बेग, शर्वरी धारगळकर, काका सावंत, किर्ती बोंद्रे आदी उपस्थित होते. येथील केशवसुत कट्ट्यावर असलेली तुतारी आता नव्याने उभारण्यात येणार असून याचा श्री साळगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी श्री साळगावकर म्हणाले की या केशवसुत कट्ट्यावर बसणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी तुतारीच्या झालेल्या या अवस्थेबाबत वाचा फोडली यावर बातम्या आपल्या कानावर येताच आपण याची जबाबदारी स्वीकारली यानंतर अनेक हात मदतीसाठी पुढे सरसावले यातून तुतारीला लागणार निधी संकलन झाला असून यासाठी आता वेगळा निधी लागण्याची गरज नाही त्यातील मोठा वाटा हा आमदार दीपक केसरकर व माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर यांनी उचलला आहे नव्या तुतारीचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे

You cannot copy content of this page