मालवण-:मालवण शहरातील देऊळवाडा पूल येथे काल मध्यरात्री विना परवाना वाळू ची वाहतूक करणारा डंपर महसूल विभागाच्या पथकाने पकडला. या डंपर मध्ये तीन ब्रास वाळू सापडली असून डंपर महसूल विभागाने ताब्यात घेतला असून डंपर मालकास दंडात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे.
काल मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास चालक परशुराम मंगलआप्पा लमाणी (रा. कुडाळ) याच्या ताब्यातील जी. ए. ०९ यु ४३९९ या क्रमांकाचा वाळू भरलेला डंपर महसूल विभागाच्या पथकाने देऊळवाडा पुलावर पकडला. या डंपर मध्ये तीन ब्रास सापडून आली. मात्र चालकाकडे वाळू वाहतूक पास आढळून आल्याने हा डंपर महसूल पथकाने ताब्यात घेत मालवण तहसील कार्यालय परिसरात आणून ठेवला आहे. या प्रकरणी डंपर मालक गुरुनाथ यशवंत पाटकर (रा. देवली, ता. मालवण) यांना विना परवाना वाळू वाहतूक केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाईची नोटीस तहसीलदारांकडून बजावण्यात आली आहे.
