प्रथमेश कातळकर यांचा मळगाव ग्रामपंचायततर्फे सत्कार

*सावंतवाडी– वेंगुर्ला येथील जिल्हास्तरीय श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत मळगाव गावचे प्रथमेश कातळकर यांनी प्रथम क्रमांक पटकावून मळगाव गावचे नाव उज्ज्वल केले. त्यांच्या घवघवीत यशाबद्दल मळगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच हनुमंत पेडणेकर, पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब, शेखर पाडगावकर व ग्रामस्थ यांनी प्रथमेश कातळकर यांचा गुणगौरव केला.

प्रथमेश यांच्या पुढील वाटचालीसाठी मळगाव ग्रामपंचायत तर्फे शुभेच्छाही प्रदान करण्यात आल्या. यावेळी प्रथमेश कातळकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

You cannot copy content of this page