भाजप भटके विमुक्त आघाडी तालुका अध्यक्ष पदी मारुती मोहिते यांची निवड…

तर युवा आघाडी अध्यक्षपदी सूर्यकांत बोडके यांची निवड…

वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुका भाजपा भटके – विमुक्त आघाडी अध्यक्षपदी मारुती मोहिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर युवा आघाडी अध्यक्षपदी सुर्यकांत बोडके यांची निवड करण्यात आली आहे. तसेच धनगर समाज वैभववाडी भाजपा अध्यक्षपदी गंगाराम अडुळकर यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा कोकण प्रभारी गोविंद गुंजाळकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव अशोकराव चोरमुले, भाजपा संघटन मंत्री शैलेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.

You cannot copy content of this page