व्यापाऱ्यांनीही आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करावे:ललित गांधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन क्लस्टर देणार; व्यापारी महासंघाचा ऑनलाईन मेळावा उत्साहात

*⚡कणकवली ता.३१-:* आदर्श संघटन कसे असावे याचे सिंधुदुर्ग व्यापारी महासंघ हे उत्तम उदाहरण आहे.अत्याधुनिक तंत्रज्ञान वापर करत महासंघाचा कार्यक्रम होत आहे.त्यामुळे कोकण मागासलेला नाही,हे दिसून येत आहे.चेंबरचे मोबाईल अँप आता उपलब्ध आहे.चेंबरमध्ये दोन सदस्य जिल्ह्यातील घेतले जाईल. कोकणात क्लस्टर एकनाथ ठाकूर यांच्या नावाने सुरु केला जाईल.पहिलं क्लस्टर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलं जाईल. महिलांसाठी क्लस्टर केलं जाईल, छोटे उद्योग उभारले जातील.चेंबर मार्फत सर्वांच्या वेबसाईट मोफत केल्या जातील.बेसिक डिजिटल प्लॅटफॉर्म दिला जाईल,तेही आठ दिवसांत अशी घोषणा चेंबर ऑफ कॉमर्स इंडट्रीज अध्यक्ष ललित गांधी यांनी केली.

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या एकता मेळावा कणकवली येथे आयोजित करण्यात आला होता.ऑनलाइन केंद्रीय मंत्री नारायण राणे,पालकमंत्री उदय सामंत,माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सूरेश प्रभू,खा.विनायक राऊत, माजी मंत्री सुरेश प्रभू, आ.नितेश राणे,तर व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर,कार्यवाह नितीन वाळके,कणकवली तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर,चेंबर ऑफ कॉमर्स इंडट्रीज अध्यक्ष ललित गांधी,सभापती मनोज रावराणे,नगराध्यक्ष समीर नलावडे,सुनील सौदागर,मुख्य व्यवस्थापक एसबीआय लक्ष्मण सरबळकर,गुंतवणूक सल्लागार डी.बी देसाई,कर अधिकारी श्री.आजगेकर,विनय सामंत,सीए अमोल खानोलकर, राजन नाईक उपस्थित होते.जिल्हा पदाधिकारी व कणकवली तालुक्यातील व्यापारी संघाचे पदाधिकारी उपस्थित आहेत.

राज्याच्या व्यापार विकासासाठी सुरेश प्रभू,एकनाथ ठाकूर यांच्यासारख्याचे चेंबरला नेतृत्व लाभलं.व्यापार ,उद्योगाला चालना देण्यासाठी चेंबर सातत्याने काम करत आहे.ऑनलाईन विक्रीचे मोठे आव्हान व्यापाऱ्यांसमोर आहे.स्वतः आपण सर्वांनी ठरवले पाहिजे की ऑनलाईन खरेदी करता कामा नये.छोट्या व्यापाऱ्यांचे नेटवर्क मोडीत काढण्याचे काम केले जात आहे.चुकीच्या पद्धतीने व्यापार काही लोक करत आहेत. ग्राहक आपल्याकडे येतो,मॉडेल पाहतो आणि तो ऑनलाईनवर मागणी करतो.त्यामुळे आपणही डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम केले पाहिजे असे चेंबर ऑफ कॉमर्स इंडट्रीज अध्यक्ष ललित गांधी म्हणाले. ऑनलाईन पध्दतीने आ.नितेश राणे म्हणाले,जिल्हा व्यापारी मेळाव्याला कणकवलीत आलेल्या सर्वांचे मी स्वागत करतो.गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीत मोठ्या अडचणी आल्या आहेत.राज्य सरकारने कोणत्याही प्रकारची मदत व्यापाऱ्यांना केली नाही.हेही यानिमित्ताने सर्व व्यापाऱ्यांनी लक्षात ठेवावे. सभापती मनोज रावराणे म्हणाले, अर्थव्यवस्थेत फार महत्वाचा भाग हा व्यापाराचा असतो.खऱ्या अर्थाने व्यापारी असल्याने व्यवहारात मजबूत होत आहेत.देशाच्या अर्थव्यवस्थेचा व्यापारी हा कणा आहे.

नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले,कणकवली शहरातील व्यापारी यांनी नगरपंचायत ला सहकार्य केले.कोरोना कालावधीत व्यापारी आमच्या सोबत राहिले.कोव्हीड सेंटर उभारलं तेव्हा सर्वात प्रथम व्यापारी संघाने मदत केली.व्यापाऱ्यांसमोर आता ऑनलाईन खरेदीचे आव्हान निर्माण झाले आहे.दीपक बेलवलकर यांचे नगरपंचायतला सहकार्य आहे. सारस्वत बँक संचालक सुनिल सौदागर म्हणाले,व्यापारी एकता मेळावा हा ३४ वा आहे,ज्या उद्देशाने महासंघ निर्माण झाला.ती कामे होत असून राज्यात एकसंघ असलेली अशी दुसरी संघटना नाही.व्यापाऱ्यांनी हिशोब चांगले ठेवावेत.

You cannot copy content of this page