बांदा ता.३१-:* पंचायत समिती स्तरावर १५ व्या वित्त आयोगातून झालेल्या रोणापाल माऊली मंदिर परिसरातील हायमास्टचे उद्घाटन माजी सरपंच प्रकाश गावडे यांच्या हस्ते संपन्न झाले. स्थानिक ग्रामस्थांची कित्येक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. हायमास्टच्या प्रकाशाने मंदिर परिसर उजळून गेला आहे.
यावेळी सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, जि. प. समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, माजी पं. स. सभापती सौ. मानसी धुरी, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, उपसरपंच भिकाजी केणी, माजी सरपंच उदय देऊलकर, बबन भोगटे, शेर्ले सरपंच उदय धुरी, दिलीप भालेकर, अमित परब, मानकरी दादा गावडे, बाबल तुयेकर, इन्सुली ग्रा. पं. सदस्य महेश धुरी आदी उपस्थित होते.
यावेळी हायमास्ट मंजुरीसाठी प्रयत्न केलेल्या सौ. मानसी धुरी यांचे आभार मानले. गेली कित्येक वर्षांपासून हायमास्टची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. हायमास्थची मागणी पूर्ण झाल्याने रोणापाल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
