जिल्ह्यातील चोरटी वाळू वाहतूक न थांबल्यास मनसे गाड्या अडविणार

मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी दिला इशारा

कणकवली ता.३१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अधिकृत परवाने घेऊन शासनास महसूल देणाऱ्या वाळू वाहतूक व्यावसायिकांच्या पोटावर पाय आणण्याचे काम हेतूपुरस्सर अनधिकृत वाळू व्यवसायिकांना महसूल प्रशासनातील झारीतील शुक्राचार्य यांकडून अभय दिले जात असल्याने आता मनसेने रस्त्यावर उतरणार असून जिल्ह्यात ठिकाणी सुरू असलेल्या वाळू वाहतुकीची अनधिकृत वाहतूक करणारी वाहने आडवे येणार असल्याचा इशारा मनसे उपजिल्हाध्यक्ष श्री दया मेस्त्री दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीर वाळू उत्खनन व वाहतूक होत असल्याचे मनसेने वेळोवेळी निदर्शनास आणून दिले आहे. परंतु प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचारी झारीतील शुक्राचार्य चे काम करीत आहेत आर्थिक देवाणघेवाणीतून अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांना अभय देत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रीतसर परवानगी घेऊन शासनाला महसूल देणाऱ्या निविदा धारकांवर अन्याय होत आहे गेले अनेक दिवस मनसेचे या अनधिकृत वाळू बद्दल आवाज उठविला आहे. सदर वाळु जिल्ह्यातील जिल्हावासीयांना जर मिळत असेल तर मनसे शांत राहील मात्र सदर अनधिकृत वाहतूक परजिल्ह्यात परराज्यांमध्ये होत असून. स्थानिकांन सोबतच अनेक परप्रांतीय या धंद्यामध्ये गुंतलेल्या आहेत. रीतसर परवाना घेऊन शासनाला महसूल देणाऱ्या निविदा धारकांवर अन्यायच आहे गेले अनेक दिवस मनसेने याविरुद्ध आवाज उठवला. दिखाऊ कामगिरी करण्याचे काम प्रशासनाकडून होत आहे. मनसेने आवाज उठवून सुद्धा या ढिम्म प्रशासनाने कोणतीही दाद दिलेली नाही. मात्र मनसे आता कायदा हातात घेणार आहे आणि त्याची पूर्ण जबाबदारी जिल्ह्यातील संबंधित महसूल प्रशासनाने घ्यावी.असे मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page