नवाबाग येथे ४ व ५ रोजी माघी गणेश जयंती

वेंगुर्ला ता.३१-:* वेंगुर्ला-नवाबाग येथील ग्रामस्थांतर्फे बायुला घुमटेश्वर मंदिर येथे ४ व ५ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. ४ रोजी गणरायाचे जल्लोषात आगमन, पूजन, आरती, दु. १२ वा. नवाबाग ग्रामस्थांची संगीत आरती, सायं. ४ वा. नवाबाग महिलांचे वारकरी भजन, ६ वा. महापुरुष मंडळ निवती यांचे भजन, ७ वा. लकी ड्राॅ कुपन स्पर्धा, त्यानंतर सातेरी प्रासादिक तरुण नाट्य कला क्रिडा मंडळ कवठी यांचे ‘मालवणी शोले‘ हे धम्माल मालवणी विनोदी नाटक होणार आहे.

दि. ५ रोजी पहाटे ५ वा. काकड आरती, सकाळी ९ वा. नवाबाग ग्रामस्थांचे वारकरी भजन, दुपारी १२.३० वा. महाप्रसाद, दु. ३ वा. स्थानिक महिलांची फुगडी व हळदीकुंकू समारंभ, सायं. ६ वा. विसर्जन सोहळा असे कार्यक्रम होणार असून भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा व कार्यक्रमांचा लाभ घ्याव असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page