वेंगुर्ला प्रतिनिधी- प्राध्यापक पदासाठीच्या राज्य पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल जाहीर झाला असून याच परीक्षेतील मराठी विषयात वेंगुर्ला येथील प्रा.मृण्मयी सचिन बांदेकर-पोकळे या पहिल्याच प्रयत्नात पात्र ठरल्या आहेत.
यापूर्वी प्रा.बांदेकर-पोकळे या अर्थशास्त्र विषयात राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) देखील पात्र ठरल्या आहेत. अशाप्रकारे दुहेरी सेट व नेट परीक्षेत यश संपादन करणा-या निवडक व्यक्तींमध्ये प्रा.बांदेकर-पोकळे यांचा समावेश झाला आहे. त्यांच्या या दुहेरी यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
