कणकवली 31 जानेवारी (प्रतिनिधी)- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या कणकवली तालुका नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून जनसंपर्क अधिकारी पदी प्रवीण गायकवाड यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी.चौधरी व महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनश्याम सांडीम यांच्या मार्गदर्शनानुसार सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक व जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर यांनी कणकवली जनसंपर्क अधिकारी पदी निवड २६ जानेवारी २०२२ रोजी जाहीर केले. सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक व जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय खानविलकर यांनी नुतन जनसंपर्क अधिकारी यांचे विशेष अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
