नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब कणकवली पोलिस ठाण्यात हजर

कणकवली ता.३१-:* जिल्हा बँक निवडणूक दरम्यान सतीश सावंत यांचे निवडणूक प्रचार प्रमुख शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब हे कणकवली पोलीस ठाण्यात सकाळी ९ वाजता हजर झाले.

त्यानंतर कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर दाखल झाले आहेत.राकेश परब याना अटक होऊन न्यायालयात हजर केले जाईल. तसेच जिल्हा न्यायालयात आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

You cannot copy content of this page