जिल्हा व्यापारी संघटनेचा आदर्श ग्रामीण व्यापारी संघटना पुरस्कार आचरा व्यापारी संघटनेला

मालवण दि प्रतिनिधी जिल्हा व्यापारी महासंघातर्फे या वर्षीचा देण्यात येणार कै प्रतापराव केनवडेकर स्म्रूती आदर्श ग्रामीण व्यापारी संघ पुरस्कार आचरा व्यापारी संघटनेला जाहिर झाला आहे. सोमवारी ३१जानेवारी रोजी कणकवली येथे होणाऱ्या व्यापारी एकता मेळाव्यात याचे वितरण केले जाणार आहे.

केवळ व्यवसाय एवढेच उद्धिष्ट न ठेवता कोरोना महामारीत सामाजिक भावनेतून अनेकाधिक उपक्रमांनी सामाजिक क्षेत्रात आचरा व्यापारी संघटनेने आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

याची दखल घेत जिल्हा व्यापारी महासंघाने या वर्षीचा कै प्रतापराव केनवडेकर स्म्रूती आदर्श ग्रामीण व्यापारी संघ पुरस्कार आचरा व्यापारी संघटनेला जाहिर केला आहे. याबाबत सर्व थरातून संघटनेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

You cannot copy content of this page