उमेद फाऊंडेशनच्या पदाधिका-यांची तळेरेच्या प्रज्ञांगण संस्थेला भेट

कणकवली ता.३०-:* कोल्हापूर येथील उमेद फाऊंडेशन या सामाजिक. संस्थेच्या पदाधिका-यांनी नुकतीच तळेरे येथील ‘प्रज्ञांगण’ या संस्थेच्या कार्यालयाला भेट देऊन संस्थेच्या उपक्रमांबद्दल कौतुक केले. यावेळी उमेद फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रकाश गाताडे, संस्थापक सदस्य विनायक पाटील, दिगंबर पाटील, सुदाम चव्हाण, प्रकाश मेहतर, दशरथ आयरे, प्रदीप नाळे तसेच जाकिर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

  ‘प्रज्ञांगण’च्या संस्थापिका सौ. श्रावणी मदभावे यांनी उमेदच्या पदाधिका-यांचे स्वागत केले. सतीश मदभावे यांनी ‘प्रज्ञांगण’च्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी ‘प्रज्ञांगण’मधील मार्गदर्शक उदय दुदवडकर, निकेत पावसकर, विश्रांती कोयंडे, प्रमोद कोयंडे, रिना दुदवडकर, उदय दुदवडकर आदी उपस्थित होते. उमेद फाऊंडेशन ही संस्था २०१४ पासून कार्यरत असून या संस्थेतर्फे वंचित आणि गरजू मुलांना शैक्षणिक मदत केली जाते. निराधार मुलांच्या शिक्षण आणि संगोपनासाठी ‘उमेद मायेचं घर’ हा प्रकल्पही सुरू करण्यात आला आहे. या संस्थेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात शैक्षणिक पालकत्व, शिष्यवृत्ती वाटप, वृद्धाश्रमांना मदत, करियर मार्गदर्शन, प्रथमोपचार पेटी वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप असे उपक्रम राबविले आहेत.

You cannot copy content of this page