हरकुळ बुद्रुक येथील रस्त्याचे केले कै . आबा आजगांवकर ‘ नामकरण

कणकवली ता.३०-: हरकुळ बुद्रुक येथील भाटदुकान ते जंगमवाडी या रस्त्याला गावातील ज्येष्ठ समाजसेवक कै. लक्ष्मण विष्णू उर्फ आबा आजगांवकर यांचे नाव देण्यात आले आहे. हा नामकरण सोहळा प्रजासत्ताकदिनी सरपंच सौ. गौसिया पटेल यांच्या हस्ते पार पडला.

याप्रसंगी माजी पं. स. उपसभापती बुलंद पटेल, पं. स. सदस्या सौ. दिव्या पेडणेकर, माजी पं. स. सदस्य राजू पेडणेकर, ग्रामसेवक श्री. कवटकर, आबा आजगांवकर यांचे चिरंजीव भाई आजगांवकर, वसंत आजगांवकर, नातू राजेश आजगांवकर, सुनील आजगांवकर, विजय गोसावी, बाळा चिंदरकर व ग्रामस्थ उपस्थित होते. आबा आजगांवकर यांनी १९६० च्या दरम्याने उपसरपंच असताना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सदरचा रस्ता तयार केरला होता. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून रस्त्याला त्यांचे नाव देण्याचा ठराव हरकुळ बुद्रुक ग्रा. पं. मध्ये घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी प्रजासत्ताकदिनी करण्यात आली. याबाबत ग्रामस्थांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page