जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांची माहिती
*⚡सावंतवाडी ता.३०-:* दोडामार्ग मध्ये शिवसेनेची नवीन कार्यकारणी १० फैबुरीवारी पर्यत जाहीर होईल. तसेच सर्वच पदाधिकाऱ्यांनी कामाला लागा अशा सुचना दिली असल्याची माहिती जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी आज सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत दिली आहे. दोडामार्ग येथे आयोजित पदाधिकाऱ्यांचा बैठकीत त्यांनी असे आदेश दिल्याची माहिती त्यांनी दिली.
ते पुढे बोलताना म्हणाले की, दोडामार्ग मध्ये जी कार्यकारणी बरखास्त केली. काही कार्यकर्त्यांमध्ये असंतोष असल्याने तिथे आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळेच ती कार्यकारणी बरखास्त केली असल्याचे स्पष्ट केले.
