आम. केसरकर यांच्या हस्ते उद्या विकासकामांची भूमिपूजने

सावंतवाडी ता.३०-: माजी गृहराज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्या, सोमवारी सावंतवाडी तालुक्यातील विविध विकासकामांची भूमिपूजने करण्यात येणार आहेत.

यामध्ये सकाळी ९.३० वाजता शिरशिंगे येथे श्री पावणाई मंदिर ते रांजणापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण, १०.४५ वाजता कलंबिस्त-वेर्ले रस्त्यावरील पुलाचे बांधकाम, ११.३० वाजता सांगेली येथे घोलेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण, दुपारी १२ वाजता सातोळी येथे ग्रामसचिवालयाचे बांधकाम, १२.४५ वाजता ओवळीये येथे मधलीवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण, १ वाजता ओवळीये गणेशकोंड येथे साकव बांधणे या कामांचा समावेश आहे.

You cannot copy content of this page