सावरवाड परिसरात बिबट्याची दहशत

तात्काळ बंदोबस्त करा; रवींद्र मडगावकर यांची वनविभागाकडे मागणी

सावंतवाडी ता.३०-: सावरवाड गावात गेले काही दिवस बिबट्याने दहशत माजविली असून त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. वनविभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नवनिर्वाचित ज़िल्हा बँक संचालक तथा पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र मडगावकर यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले असून त्यात नमूद करण्यात आले की, सावरवाड गावात गेले काही दिवस बिबट्याचा वावर असून काही ग्रामस्थांना त्याचे दर्शनही झाले आहे. त्याच्याबरोबर लहान पिल्लू असून हा मादी बिबट्या असावा, असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. सध्या वायंगणी शेतीची कामे सुरु आहेत. तसेच लाकूडफाटा आणि इतर कामांसाठी महिलावर्गाचाही डोंगरभागात वावर असून बिबट्याच्या वावरामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मडगांवकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page