पायी वारीचे पंढरपूरकडे झाले प्रस्थान

वारकऱ्यांचा टाळ मुदूंग गजराता विठ्ठलाचा जयघोष

कणकवली ता.२९-:* प.पू.भालचंद्र महाराज वारकरी पायी दिंडी मंडळाची माघी पायी वारी आज शनिवारी सकाळी कणकवलीहून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले.तदपूर्वी वारकर्यांनी भालचंद्र महाराज यांचे दर्शन घेतले.

गेले दोन वर्षे कोरोनामुळे वारीच्या आंनदीसोहळ्याला ब्रेक लागता होता.आता कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर वारकऱ्यांचा पायी वारीचा आंनदीसोहळा पुन्हा एकदा सर्वांना अनुभवता येणार आहे.एकदाशीनिमित्त सिंधुदुर्गातून दरवर्षी पायी वारीकरत वारकरी पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जाजात. मात्र,कोरोनामुळे गेली दोन वर्षे निर्बंधांमुळे वारकऱ्यांना पायी वारी करता आली नव्हती.आता कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर सिंधुदुर्गातील वारकरी पंढरपुरच्या दिशेने रवाना झाले आहेत.प.पू भालचंद्र महाराज वारकरी पायी दिंडी मंडळाच्या वारकऱ्यांची पायी वारीने कणकवलीहून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले .

कणकवली शहरात वारकऱ्यांनी टाळ मुदूंग गजराता विठ्ठलाचा जयघोष केले.आप्पासाहेब पटवर्धन चौकात रिंगण करून विठूराचा नामघोष करत संतांचे अभंग म्हटले.रिंगणाचा आनंदसोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.हा रिंगण सोहळा पाहताना उपस्थितांना जणू काही वैष्णवांचा मेळा भरल्याची प्रचिती आली.कणकवलीतून ही वारी पंढपूरच्या दिशेने रवाना झाली असून या वारी, ह.भ.प.गवंडळकर ह.प.भ.गायकवाड , ह.भ.प.मडवी,हर्षल अंधारी यांच्यासह वारकरी सहभागी झाले आहेत .

You cannot copy content of this page