बांद्यात ८९ गावठी बॉम्ब पकडले

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

*⚡बांदा ता.२९-:* स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तब्बल ८९ गावठी बॉम्ब बांदा–सटमटवाडीत पकडले. याप्रकरणी सादीक अन्वर खान (रा. बांदा सटमट) याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. हस्तगत केलेल्या गावठी बाँबची किंमत सुमारे ३० हजार रुपये आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळालेला गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई आज सायंकाळी करण्यात आली.

या कारवाईत तब्बल ८९ गावठी बॉम्बसह दोन बंदुकीच्या नळ्या, चार काडतुसे असा शिकारीचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. मिळालेल्या गावठी बॉम्बची किंमत अंदाजे तीस हजार इतकी आहे. दरम्यान ते आपल्याजवळ बाळगणाऱ्या सादिक खान याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यावेळी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बागाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र घाग, सचिन शेळके, अवधुत बनकर, अमित गोते, प्रवीण वालावलकर आणि बांदा पोलिस आदींच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली.

You cannot copy content of this page