मालवण पंचायत समिती उप सभापती राजू परुळेकर यांनी स्व: खर्चातून राबवला उपक्रम...
मालवण ता.२९-: आचरा – बेळणे- कणकवली मार्गावर भाजीपाला विक्री करणाऱ्या गोठणे येथील भाजी उत्पादक आणि वितरक महिला यांना मालवण पंचायत समितीचे उपसभापती राजू परुळेकर यांनी स्व:खर्चातून भाजीपाला बी बियाणे वाटप केले. आचरा बेळणे मार्गावर गोठणे येथील भाजी विक्रेते पालेभाजी व गावठी भाज्यांची विक्री करतात.
गेली अनेक वर्षे भाजी विक्री हेच त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. त्यामुळे अशा विक्रेत्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने उपसभापती राजू परुळेकर यांनी स्व: खर्चातून बियाणे वाटप केले. उपसभापती परुळेकर व विभागीय अध्यक्ष प्रशांत परब यांच्या हस्ते बियाणे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला सरपंच सौ. श्रेया चव्हाण, उपसरपं राजू लाड, माजी सरपंच घनश्याम चव्हाण, दया हाटले, तुषार हाटले, शैलेश चव्हाण, शैलेश लाड, महादेव सावंत आणि भाजी उत्पादक महिला उपस्थित होत्या. भाजीपाला बी-बियाणे उपलब्ध करून दिल्याबद्दल राजू परुळेकर, प्रशांत परब आणि सर्व सहकाऱ्यांचे भाजी विक्रेत्यांनी आभार मानले.
