हिंदळे राणेवाडी येथे बंद घर तोडून चोरी…

अज्ञाताविरोधात पोलिस स्थानकात गुन्हा दाखल; कॅमेरासह पाच हजाराची चोरी…

देवगड ता.२९-:* तालुक्यातील हिंदळे राणेवाडी येथील राहत्या घराची दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला व घरातील कपडे विस्कटले कपाट उघडून त्या कपाटातील जुना वापरातील कॅमेरा रु ५०००/-हजार अज्ञात व्यक्तीने चोरून नेला अशी फिर्याद हिंदळे राणेवाडी येथील अनंत गणपत राणे यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. सदरची घटना २७ जाने. दु.३ ते २८ जाने. स.१० दरम्यानच्या मुदतीत घडली आहे.

या घटनेसंदर्भात अज्ञात व्यक्ती विरुद्ध भादवी कलम ४५४,४५७,३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास देवगड पोलीस स्थानक प्रभारी पोलीस उपनिरीक्षक श्री देसाई यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण ,पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील ठोंबरे करीत आहेत.

You cannot copy content of this page