मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त रेवंडी भद्रकाली ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शन व स्पर्धा संपन्न

मालवण ता.२९-:* मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने रेवंडी येथील श्री भद्रकाली ग्रंथालयामध्ये काही निवडक ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, लेखन व मराठी गीतगायन स्पर्धाही घेण्यात आली तसेच गावातील मान्यवर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष युवराज कांबळी, जयराम कांबळी, अरविंद कांबळी, नरेश करलकर, रेवंडी सरपंच प्रिया कांबळी, रवींद्र कांबळी, प्रथमेश करलकर, केळुसकर, मुख्याध्यापिका, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.

यावेळी सरपंच प्रिया कांबळी यांनी मराठी भाषेचे महत्व विशद करताना प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना मराठी माध्यमातून शिक्षण द्यावे, असे सांगितले. तर विजय कांबळी यानीही मराठी भाषेवर मनोगत व्यक्त केले. यानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये वाचन स्पर्धा- प्रथम क्रमांक – दीप किशोर कांबळी, द्वितीय क्रमांक – शौर्या मनोज कांबळी. लेखन स्पर्धा- प्रथम क्रमांक – शौर्या मनोज कांबळी, द्वितीय क्रमांक – दीप किशोर कांबळी. अंताक्षरी स्पर्धा प्रथम क्रमांक – गौरी अभिजित केणी, द्वितीय क्रमांक – कृतिका किशोर कांबळी यांनी यश मिळविले. या विजेत्यांना ग्रंथपाल सुषमा मयेकर, माजी सभापती सोनाली कोदे, रेवंडी पोलीस पाटील मनोदया कांबळी यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन विजय कांबळी याने केले. कोरोना विषयक नियम पाळून हा कार्यक्रम पार पडला.

You cannot copy content of this page