संत शिरोमणी गुरू रविदास मंडळाच्या मालवण शहराध्यक्ष पदी गणेश पाडगावकर

मालवण ता.२९-:संत शिरोमणी गुरू रविदास मंडळाची २०२२- २३ या वर्षासाठी मालवण शहर नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली असून मालवण शहर अध्यक्षपदी श्री. गणेश पाडगावकर यांची तर सचिव पदी देवेंद्र चव्हाण निवड करण्यात आली आहे.

संत शिरोमणी गुरू रविदास मंडळाच्या मालवण शहर कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष – निलेश माणगावकर, उपाध्यक्ष/कोषाध्यक्ष- नितीन चव्हाण, सहसचिव – गणेश भिलवडकर, महिला सदस्य- सुमन आडवलकर, नेत्रा माणगावकर, सदस्य- प्रसाद आडवलकर, हेमंत माणगावकर, पद्माकर माणगावकर, राजन माणगावकर, बबन आडवलकर, सल्लागार – हरेश चव्हाण, सुधाकर माणगावकर, नंदकिशोर पाडगावकर यांची निवड करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page