वेंगुर्ला प्रतिनिधी– प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने समाजामध्ये खया अर्थाने तरुणांना निरोगी, बलवान सुदृढ बनवणा-या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यायामशाळा व व्यायामशाळांमध्ये आपल्या अनुभवाचा उपयोग तरुणांना देऊन एक आदर्श नागरिक बनवण्यात सिंहाचा वाटा असणा-या व्यायाम प्रशिक्षकांचा श्री सातेरी व्यायामशाळा वेंगुर्ल्याच्यावतीने सन्मान करण्यात आला.
यामध्ये उभादांडा येथील सिद्धेश्वर व्यायामशाळेचे मुख्य प्रशिक्षक दादा पेडणेकर यांचा आंतरराष्ट्रीय शरिरसौष्ठवपटू किशोर सोनसुरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य कुस्तीगिर आगोस्तीन आल्मेडा, राष्ट्रीय खेळाडू व क्रिडा शिक्षक अमोल तांडेल, सातेरी व्यायामशाळेच्या संचालिका अबोली सोनुरकर, राज्य आदर्श प्रशिक्षक हेमंत नाईक, आंतरराष्ट्रीय खेळाडू अंकित सोनसुरकर, व्यायामपटू पिट्या कुडपकर आदी उपस्थित होते. भविष्यात जिल्ह्यातील सर्व व्ययामशाळांना भेट देऊन त्यांचे पुनरुज्जीवन कसे करता येईल याबाबत विशेष प्रयत्न करणार असल्याचे किशोर सोनसुरकर यांनी सांगितले.
