सांगेलीतील शिवसेना विभागीय शाखेचे उद्या उदघाटन

अरुण दुधवडकर, आम. दीपक केसरकर यांची उपस्थिती

सावंतवाडी ता.२९-:* सांगेली जायपीवाडी येथील शिवसेना विभागीय शाखेचा उद्घाटन सोहळा 30 जानेवारी रोजी सकाळी बारा वा होणार आहे सांगेली जायपीवाडी येथे हा उद्घाटन सोहळा होणार असून या सोहळ्यात सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन माडखोल जिल्हा परिषद शिवसेना वि. अध्यक्ष पुरूषोत्तम राऊळ यांनी केले आहे.

सर्व शिवसेना जेष्ठ व युवा कार्यकर्ते माडखोल जिल्हा परिषद आयोजित या उद्घाटन सोहळ्याला उद्घाटक म्हणून जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर हे लाभणार आहेत तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, माजी जिल्हा बँक चेअरमन सतिश सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, उपजिल्हा प्रमुख अशोक दळवी, ग्राहक सहकार जिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, उप जिल्हा संघटक शब्बीर मणीयार, युवा तालुकाप्रमुख योगेश नाईक, उपतालुका प्रमुख संदीप उर्फ बाळु माळकर, जिल्हा परिषद सदस्य कोलगांव मायकल डिसोजा हे उपस्थित राहणार आहेत

You cannot copy content of this page