पालकांच्या रांगोळी स्पर्धेत अक्षता गिरप प्रथम

वेंगुर्ला शाळा नं.२चा उपक्रम

वेंगुर्ला प्रतिनिधी– स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त व प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला शाळा नं.२ मध्ये पालक व माजी विद्यार्थ्यांसाठी खुली देशभक्तीपर रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. यात १५ जणांनी सहभाग घेतला. अक्षता गिरप हिने प्रथम, श्रेया मयेकर हिने द्वितीय, सई सातार्डेकरने तृतीय तर साध्वी मिडे हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला.

परीक्षक म्हणून शिक्षिका नीना मार्गी, राजश्री भांबर व दाभोली हायस्कूलच्या शिक्षिका समृद्धी पिळणकर यांनी काम पाहिले. यावेळी वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अतुल मुळे, डॉ. संगीता मुळे, निवृत्त शिक्षक रमण किनळेकर, निवृत्त केंद्रप्रमुख कैवल्य पवार, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संजय पिळणकर, आवळे सर, माजी नगरसेवक धर्मराज कांबळी, राजन गावडे, शिक्षक-पालक उपाध्यक्ष महेश गावकर, प्रितम ओगले आदींनी या उपक्रमास भेट देऊन कौतुक केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शाळा व्यवस्थापन उपाध्यक्ष अश्वेता माडकर, सई सातार्डेकर, साक्षी खानोलकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page