मालवण पोलीस निरीक्षक कोरोना पॉझिटिव्ह

मालवण ता.२९-:मालवण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. ओटवणेकर यांना सौम्य लक्षणे असल्याने डॉक्टर सल्ल्यानुसार ते सध्या मालवण पोलीस स्थानक येथील शासकीय निवासस्थानी विलगीकरणात आहेत.

यापूर्वी मालवणचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. बालाजी पाटील हे कोरोना पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतर ओटवणेकर हे पॉझिटीव्ह आले आहेत, ओटवणेकर यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या व कोरोनासदृश्य लक्षणे असणाऱ्यांनी कोरोना तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page