कणकवली अर्बन निधी लिमिटेडचा शुभारंभ

जिल्ह्यातील पहिलीच शास्वत व विश्वासार्ह संस्था:ॲड.राजेंद्र रावराणे

कणकवली 27 जानेवारी (प्रतिनिधी)– प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कणकवली अर्बन निधी लिमिटेड कणकवलीचे उद्घाटन तहसीलदार आर. जे. पवार आणि प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी या वित्तीय संस्थेच्या माध्यमातून अर्थिक साक्षरता वाढेल असे देखील सांगण्यात आले, निधी लिमिटेड हा भारत सरकार मान्यताप्राप्त जिल्ह्यातील पहिलीच शास्वत आणि विश्वासार्ह संस्था आहे असे ॲड.राजेंद्र रावराणे म्हणाले.

या कार्यक्रमावेळी संस्थेचे चेअरमन प्रा.हरीभाऊ भिसे, व्हाईस चेअरमन डॉ. सुभाष सावंत, सेक्रेटरी रंजन चव्हाण, खजिनदार प्रितम पारकर संस्थेच्या डायरेक्टर सौ. सुरेखा भिसे,सौ. युगंधरा सावंत, सौ.रुपाली चव्हाण, सौ.प्राची पारकर, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, संदेश पारकर,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, डॉ.विद्याधर तायशेटे, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष गणेश जेठे, प्रा.निलेश महेंद्रकर, उद्योजिका सौ.लीना काळसेकर, समाजसेवक अमर पारकर, उद्योजक विशाल कामत, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष लवु पिळणकर, अभिनेते निलेश पवार, साहित्यिक महेश काणेकर, सर्वेश भिसे,उद्योजक राजा राजाध्यक्ष, सौ.विहा वाळके, सौ.प्रांजल राणे व इतर मान्यवर आणि सिंधुगर्जना पथकाचे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे चेअरमन प्रा.हरीभाऊ भिसे यांनी मांडले यावेळी त्यांनी विनम्र व तत्पर सेवा देण्याचा प्रयत्न संस्थेमार्फत करणार व तळागाळातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना या संस्थेशी जोडणार असल्याचे सांगितले आणि संस्थेमध्ये शेअर्स घेण्यासाठी किंवा खाते चालू करण्यासाठी नोंदणी करून विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले तसेच आभार प्रा.निलेश महेंद्रकर यांनी मानले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते निलेश पवार यांनी केले.

You cannot copy content of this page